in

भारतात कोरोना रुग्णांचा आकडा 55 लाखांच्या पार

The havoc of the corona; 11,000 new patients registered in the state in 24 hours
The havoc of the corona; 11,000 new patients registered in the state in 24 hours
Share

देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. आता गेल्या 24 तासांत समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 लाखांच्या पार पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात मागील चोवीस तासांमध्ये 75 हजार 83 नवे करोनाबाधित आढळले असून, 1 हजार 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या 55 लाख 62 हजार 664 वर पोहचली आहे. या करोनाबाधितांमध्ये 9 लाख 75 हजार 861 अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले 44 लाख 97 हजार 868 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 88 हजार 935 जणांच्या संख्येचा समावेश आहे.

रुग्ण रिकव्हरी दर 80 टक्के

जगातील इतर देशांच्या तुलनेत करोनाच्या संसर्गात भारत वेगाने पुढे जात असल्याने निर्माण ही चिंतेची बाब आहे. मात्र गेल्या तीन दिवसांत 90 हजार रुग्ण बरे झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या सलग तीन दिवसांच्या आकडेवारीमुळं भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

शरद पवार यांचा अन्नत्यागाचा निर्णय