राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. दिवसभरात 6 हजार 281 नवे रुग्ण आढळले. त्यातही अमरावती जिल्ह्यात 1058 रुग्ण सापडले आहेत. तर, मुंबईत नव्या 897 रुग्णांचे निदान झाले
गेल्या 15 दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शुक्रवारी (19 फेब्रुवारी) हा आकडा 6 हजार 112 वर पोहोचला होता. तर, आज (20 फेब्रुवारी) 6 हजार 281 नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजपर्यंत 1 कोटी 56 लाख 52 हजार 742 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 20 लाख 93 हजार 913 (13.38 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 2 लाख 28 हजार 60 व्यक्ती होमक्वारंटाइन तर, 1 हजार 610 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
तर, 2 हजार 567 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत एकूण 19 लाख 92 हजार 530 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.16 टक्के झाले आहे. आज 40 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 51 हजार 753 वर पोहचला आहे. त्यानुसार मृत्यूदर 2.47 टक्के झाला आहे.
मुंबईत नवे 897 रुग्ण
मुंबईत 897 नवे कोरोनाबाधित आढळले असून कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 18 हजार 207वर पोहोचली आहे. एकूण तीन जणांच्या मृत्यूंची नोंद झाली असून 11 हजार 438 जणांचा मृत्यू झाला आहे.
येथे आढळले 400हूऩ अधिक रुग्ण
- मुंबई पालिका – 897
- पुणे पालिका – 430
- अमरावती पालिका – 806
- नागपूर पालिका – 548
Comments
Loading…