in

आग्र्यातील मुघल म्युजियमला महाराजांचं नाव

Share

अख्खं जग नतमस्तक होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आता उत्तर प्रदेशातही होणार आहे. याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आग्र्यातील निर्माणाधीन मुघल म्युजियमला छत्रपती शिवाजी महाजारांचं नाव देण्यात येणार आहे.

तसेच उत्तर प्रदेश सरकार राष्ट्रवादी विचारांवर चालणारी आहे. गुलामी मानसिकतेच्या प्रतिकात्मक चिन्हांना दूर करीत राष्ट्राप्रती गौरव करणाऱ्या विषयांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. ‘आमचे नायक मुघल होऊ शकत नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजचं आमचे नायक आहेत. ‘ मुख्यमंत्री योगींनी व्हिडीओ कॉन्फरन्गिंच्या माध्यमातून आग्रा मंडळाच्या विकास कार्यांवरील चर्चेदरम्यान याला मंजुरी दिली आहे.

आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच, पण त्याचे कारण ठरलेले आधीचे सगळेच प्रसंग पाहिले तर मिर्झाराजांसारख्या मुत्सद्दय़ाला शिवरायांनी किती मुत्सद्दीपणे तोंड दिलं हे लक्षात येतं.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

टॉमेटो मुंबईत 50 तर रत्नागिरीत 40 रुपये किलो

भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण