अंधेरीच्या पवई परीसरातील म्हाडा इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची अद्यापतरी माहिती नाही आहे, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या आहेत.
पवई परिसरात असलेल्या म्हाडा इमारतीतील एका रुममध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. हि आग इतकी भीषण आहे की, इमारतीतील इतर रूम्सना आग लागण्याची भीती आहे. दरम्यान आगीच्या धुराचे लोण परिसरात पसरले आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही आहे. तसेच आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्टचं आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच युध्दपातळीवर हि आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Comments
0 comments