in

इंटरनेट हा शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार; अमेरिकेने दिला सर्वोच्च न्यायालयाचा दाखला

लोकशाही न्यूज नेटवर्क

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. तीन कृषी कायद्यासंदर्भात अमेरिकेने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, शेतकऱ्यांना इंटरनेटसारख्या सुविधा मिळाल्या पाहिजेत असं म्हणत अमेरिकेने शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

यासोबतच अमेरिकेने म्हटले आहे की, भारतीय बाजारपेठांची गुणवत्ता वाढवणाऱ्या सुधारणा आणि खासगी क्षेत्रामध्ये अधिक गुंतवणुकीला प्राधान्य देणाऱ्या बदलांचं अमेरिका स्वागत करत आहे. दोन पक्षांमधील मतभेद हे चर्चेने सोडवले गेले पाहिजे. असे अमेरिकेने सांगितले आहे.


एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जो बायडेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही खंड न पडू देताना माहिती आणि इंटरनेची सेवा शेतकऱ्यांना मिळावी हा त्यांच्या विचार स्वातंत्र्याअंतर्गत येणारा मूलभूत अधिकार तसेच लोकशाहीचा भाग आहे असे अमेरिकेचं मत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“सरकारचे असे काही धंदे चालतात …”; ठाकरे सरकारवर राज्यपालांची टीका

शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का ? आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल