in

कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या हॉटेलचं बील पोहोचलं कोटींच्या घरात

The hotel bill of the doctor treating Corona reached the house of crores
The hotel bill of the doctor treating Corona reached the house of crores
Share

गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता शेकडो डॉक्टर, नर्स अहोरात्र कोरोना बाधित रुग्णांवर उपाचर करत आहे. या सरकारी आणि खाजगी डॉक्टार्स, नर्स आणि अनेक शासकीय प्रशासनाने रुग्णालयांच्या लगत असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आहे. परंतु संबंधित हॉटेल मालकांनी यासाठी प्रशासनाला प्रति व्यक्ती प्रति दिनसाठी तब्बल २ हजार रुपयांचा रेट लावला आहे. त्यानुसार एका हॉटेलने तब्बल ८६ लाख ७१ हजार रुपयांचे बील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले असून, बीलाचे पैसे मिळण्यासाठी वारंवार विचारणा केली जात आहे. परंतु सध्या जिल्हा आपत्ती प्रतिसाद खात्यामध्ये असलेला निधी इतर अत्यावश्यक गोष्टींसाठी खर्च झाला असून, आता हॉटेलची कोट्यवधी रुपयांची बीले कसे आदा करायचे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

पुण्यात सुरुवातीला एक महिना केवळ नायडू हॉस्पीटलमध्येच कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढालया लागली. त्यामुळे प्रशासनाने ससून रुग्णालयास अन्य काही खाजगी रुग्णालयांमध्येदेखील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. यासाठी सरकारीसह काही नामांकित खाजगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करुन त्यांना कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यास सांगण्यात आले.

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणा-या काही डॉक्टर आणि नर्सच्या कुटुंबीयांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर या खाजगी डॉक्टरांनी आपली हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. त्यानुसार सुरुवातीला प्रशासनाने केवळ या नामांकित डॉक्टरची पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय केली. त्यानंतर प्रशासनाने ससून रुग्णालयांमध्ये काम करणा-या वरिष्ठ, निवासी डॉक्टरांसह कोरोनाची ड्युटी करणा-या नर्सची देखील हॉटेलमध्ये सोयी केली.

सध्या एकूण सुमारे ५०० ते ६०० सरकारी व खाजगी डॉक्टर, नर्स यांची शहरातील काही हॉटेलमध्ये राहाण्याची सोय करण्यात आली आहे. यात पुणे शहरातील हॉटेल पवन, लेमन ट्री, आर्शिवाद हॉटेल, पंचरत्न ही हॉटेल अधिग्रहण करुन येथे ससून हॉस्पीटलसह सुमारे ८० खाजगी डॉक्टरची निवासाची सोय करण्यात आली आहे. त्यापैकी एका हॉटेलनेच ८६ लाख ७१ हजार रुपयांचे बील जिल्हा प्रशासनाला सादर केले. त्यापैकी ३३ लाख ५२ हजार रुपयांचे बील सीएसआर निधीद्वारे आदा करण्यात आली. परंतु आता शिल्लक ५३ लाख १८ हजार रुपयांसाठी संबंधित हॉटेल मालकांकडून वारंवार प्रशासनाकडे तगादा लावला आहे.

जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी अतर्गत पुण्यासाठी ७२ लाख १२ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. यापैकी १४ लाख विभागीय व्यवस्थापक रेल्वे यांना विशेष श्रमिक रेल्वे खर्चासाठी, ६ लाख विश्वानंद परिपुर्ण आयुवैदिक चिकित्सालय यांना, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना १५ लाख रुपये आणि पुणे शहर तहसिलदार यांना १५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ही हॉटलेची कोट्यावधी रुपयांची बीले देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे निधी शिल्लक नसून, किमान एक कोटी रुपयांचा निधी त्वरीत मिळावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

SushantNOMore: The one I was going to marry, the one I was going to marry

SushantNoMore : जिच्यासोबत होणार होतं लग्न, तिच्यासोबतच झालं असं काही की…

त्याच्या आयुष्यातील ती 50 स्वप्न; जी पूर्ण होता होता राहिली…