in

कोरोनाचा कहर; रूग्णसंख्या 66 लाखाच्या पार

Shocking increase in corona patients in the state
Shocking increase in corona patients in the state
Share

देशात कोरोनाचा संसर्ग वाढतचं चालला आहे. गेल्या 24 तासांत वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे आता हा आकडा 66 लाखाच्या पार पोहोचला आहे. त्यात अद्यापही लस विकसित न झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

गेल्या 24 तासांत देशात 74 हजार 442 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर, 903 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 66 लाख 23 हजार 816 वर पोहचली आहे.यामध्ये सध्या 9 लाख 34 हजार 427 अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले 55 लाख 86 हजार 704 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 लाख 2 हजार 685 जणांच्या संख्येचा समावेश आहे.

राज्यातली आकडेवारी

राज्यात रविवारी 13702 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली होती. तर नवीन 15048 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. एकूण 1149603 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 255281 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 79.64% झाले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अभिनेता अर्जुन बिजलानीच्या पत्नीला कोरोना

Gold prices fall

Today Gold Price;आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरले सोन्याचे दर, चांदीही गडगडली