in ,

कोरोनाचा कहर ; एकाचं दिवसात 62 हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Share

गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. यामध्ये देशात गेल्या 24 तासांत 62 हजार 64 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 1 हजार 7 रुग्णांच्या मृत्यू झाला. तर देशात सध्या 6 लाख 34 हजार 945 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात सर्वाधित कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून येथील कोरोनाबाधितांच्या संख्येने 5 लाखांच्या टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 17 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये आढळले आहेत. दरम्यान जगातील देखील कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी पुढे गेली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख 15 हजार 75 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 44 हजार 386 रुग्णांचा मृत्यू झाला असून 15 लाख 35 हजार 744 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

तसेच 9 ऑगस्टपर्यंत 2 कोटी 45 लाख 83 हजार 558 नमुन्यांंच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी 4 लाख 77 हजार 23 नमुन्यांच्या चाचण्या रविवारी झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (Indian Council of Medical Research (ICMR))ने दिली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख 15 हजार 75 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 44 हजार 386 रुग्णांचा मृत्यू झाला असून 15 लाख 35 हजार 744 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Sushant Singh Rajput Suicide; रिया चक्रवर्तीची आज पुन्हा चौकशी होणार

जोधपूरमध्ये एकाच घरात 11जणांची हत्या