in

शासनाने यंदाचा पालखी सोहळा बायो- बबल पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा मोजक्याच ५०० वारकऱ्यांसमवेत पायी करण्याचा आग्रह सरकारने केला होता. या पार्श्वभूमीवर शासनाने आयपीएल प्रमाणेच जैव सुरक्षा कवचामध्ये (बायोबबल) श्री संत तुकाराम महाराज ३३६ व्या पालखी सोहळ्यास पंढरपूरला नेण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी सोहळ्या संदर्भात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच सभा घेतली होती. या सभेमध्ये मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनी मोजक्याच ५०० वारकऱ्यांसमवेत पायी वारीचा आग्रह धरला होता. या सभेत पुढील आढवड्यात या संदर्भात कॅबिनेट मध्ये चर्चा होवून सकारात्मक निर्णय घेऊ असे पवार यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने बायोबबलला परवानगी दिल्यास श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सर्व नियमांचे पालन करण्यात येईल.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

औरंगाबादमध्ये संपादकावर हल्ला… नारायण राणे समर्थकांचा व्हिडीयो व्हायरल

Uddhav Thackeray | लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढलं… राज्यभरात ‘कोरोनामुक्त गाव’ मोहीम राबवणार