पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर झाली. काँग्रेसकडून मोयनामधून माणिक भौमिक यांना तिकीट देण्यात आलं आहे. या ठिकाणी भाजपाकडून माजी क्रिकेटर अशोक दिंडाला तिकीट देण्यात आले. काँग्रेसनं शनिवारी 13 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यातील 5 उमेदवार हे पहिल्या टप्प्यातील तर अन्य 8 उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील आहेत.
भाजपनेही आपल्या 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाकडून आजसू यांना तिकीट देण्यात आलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपाने सुवेंदु अधिकारी यांना रिंगणात उतरवलं आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 57 जणांच्या पहिल्या उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती भाजपाचे सचिव अरुण सिंग यांनी दिली.
Comments
Loading…