in

वचन देतो, येत्या 5 वर्षात भारतातील संपूर्ण पायाभूत सुविधा बदलतील – नितीन गडकरी

नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही एक भक्कम पाया तयार केला आहे, ज्यामध्ये आम्ही मागील 5 वर्षात 17 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. मी तुम्हाला वचन देतो की येत्या 5 वर्षात भारतातील संपूर्ण पायाभूत सुविधा बदलतील आणि त्या अमेरिका आणि युरोपसारख्या होतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

देशातील विकासाच्या बाबतीत मागासलेला भाग, पूर्वोत्तर आणि सीमाभागांचा विकास हे सरकारचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. . ग्रीन एक्सप्रेसवे कॉरीडोरचं नेकवर्क पूर्णपणे सज्ज आहे. ज्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि 30 किमी द्वारका द्रुतगती मार्गाचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे कैलास मानसरोवर प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे, यामुळे आगामी काळात कैलास मानसरोवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमी प्रवास करावा लागेल. त्याचबरोबर चार धाम प्रकल्पावरही काम सुरू आहे. म्हणजेच आता कोणत्याही मोसमात गंगोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ प्रवास करता येईल. यावर एकूण 12000 कोटींचा खर्च होत आहे.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, त्यांचे लक्ष जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांवर आहे, जेथे दररोज 35 कि.मी. रस्ता तयार होत आहे आणि गेल्या 358 दिवसांपासून ते निरंतर सुरु आहे. जर आपण त्याच वेगाने पुढे जात राहिलो तर येत्या काळात दिवसाला 35 ऐवजी 40 किमी रस्त्यांचे बांधकाम होईल.

परिवहन मंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन अंतर्गत 111 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवले आहे आणि हरित दृष्टीकोन स्वीकारून सरकार ‘पर्यावरणाला हानी न पोहोचवता विकास करण्याचा प्रयत्न करीत आहोत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता मिळणार 12 वर्षाखालील मुलांसाठी कोरोना लस

Deepali Chavan Suicide | दीपाली चव्हाणची ऑडिओ क्लिप व्हायरल