in

वीजवाहिन्यांवर आता ड्रोनची नजर; ड्रोन वापरणारी ‘महापारेषण’ देशातील पहिली कंपनी

Mahapareshan is the first company in the country to use drones
Mahapareshan is the first company in the country to use drones
Share

वीजवाहिन्या म्हटलं की मोठ मोठे ट्रान्सफॉर्मर आपल्या नजरेसमोर येत असतात. या ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातूनच शहरी आणि ग्रामीण भागात वीज पुरवठा होत असतो. हे ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघाल तर अतिशय दुर्गम भाग, समुद्रकिनारी आणि खाडीभागात उभे असतात. त्यामुळे एखादी अडचण निर्माण झाली तर इंजिनिअर्संना मोठी कसरत करावी लागते. मात्र आता इंजिनिअर्सच्या मदतीला ड्रोन असणार आहे.

उच्च दाब वीज वाहिन्यांची निगा राखण्याचे काम ड्रोनव्दारे करण्याचा उपक्रम महापारेषणव्दारे घेण्यात आलाय. यात ग्राऊंड पेट्रोलिंग, टॉवर टॉप पेट्रोलिंग, सर्व्हे आदी कामांचा समावेश आहे. यामुळे महापारेषणचा वेळ, पैसा, मनुष्यबळाची बचत होणार आहे, असे महापारेणनचे अधिकारी म्हणतात. ड्रोनवर व्हिडिओ कॅमेरा व थर्मोव्हिजन कॅमेरा लावला असल्यामुळे पारेषण वाहिन्यांवर निर्माण होणारे विविध दोष त्वरित निदर्शनास आणून त्यांची तात्काळ दुरूस्ती करणे शक्य होईल, अशी माहिती स्काई टेक्नोलॉजी कंपनीचे अधिकारी संकेत जजानी यांनी दिली आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाने या कामाला परवानगी दिली आहे. त्यामुळे वीज क्षेत्रात ड्रोनचा वापर करणारी ‘महापारेषण’ ही देशातील एकमेव कंपनी ठरली आहे. महापारेषण ही देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी असून या कंपनीचे राज्यात एकूण 681 इएचव्ही उपकेंद्रे आहेत, तर 48 हजार 321 सर्किट किलोमीटरच्या पारेषण वाहिन्या आहेत. सध्या महापारेषण कडे 1 लाख 27 हजार 990 एमव्हीए क्षमतेची परिवर्तन क्षमता असून 25 हजार एमडब्ल्यू ऊर्जा हाताळणीची क्षमता असलेली पारेषण यंत्रणा आहे, अशी माहिती महापारेषणचे एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर, निलेश डगवार यांनी दिली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Testing of beta version of Android 11

तुमच्याकडे 2GB किंवा त्याच्यापेक्षा कमी रॅम असलेला फोन आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी

deepika and priyanka

दीपिका, प्रियंका चोप्राच्या प्रचंड फॉलोअर्समधली फेक अकाऊंट्स आली समोर…