in

‘द डिसायपल’ला व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार

Share

‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाला व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन चैतन्य ताम्हाणे यांनी केलं असून चैतन्य ताम्हाणे हे युरोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत पहिले भारतीय दिग्दर्शक ठरले आहेत.


या चित्रपटाची कथा ही शास्त्रीय संगीत गायकाच्या जीवनाशी निगडीत असून हा चित्रपट गेल्या आठवड्यात व्हेनिस महोत्सवात दाखवण्यात आला आणि तिथल्या परिक्षकांनी या चित्रपटाचा गौरव केला.

शास्त्रीय संगीताचे विश्‍व माझ्यासाठी खुले करणाऱ्या सर्व संशोधक , लेखक, संगीतकार या सर्वाना हा पुरस्कार समर्पित करत आहे. असे चैतन्य ताम्हाणे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.


शनिवारी झालेल्या सोहळ्यामध्ये स्पर्धेतील विजेत्यांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘I Support Kangana Ranaut’ नावाची नवी साडी लाँच, पाहा कशी आहे ‘ही’ साडी

सायन रुग्णालयाचा घोळ: परस्पर किडनी काढून मृतदेह दुसऱ्यांना दिला, नातेवाईंकाचा आरोप