in

विधानसभा 9 वेळा तहकूब; हिरेन…वाझे…डेलकर…अन्वय नाईक…प्रकरणांच्या गदारोळामुळे

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा सातावा दिवस राज्यातील प्रमुख हत्या व आत्महत्या प्रकरणाने चांगलाच पेटला होता. सत्ताधारी व विरोधी पक्षनेत्यांकडून एकमेंकावर या गंभीर प्रकरणाचे आरोप करून घेरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सध्या चर्चेत असलेले मुकेश अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाच्या गाडीचा मालक मनसुख हिरेन प्रकरण, याच प्रकरणात चर्चेत असलेले सचिन वाझे. तसेच मोहन डेलकर व अन्वय नाईक प्रकरणांनी अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरला. दरम्यान आज विधानसभेतील गदारोळामुळे 9 वेळा सभागृह तहकूब करण्यात आला.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा तक्रार अर्जच सभागृहात वाचून दाखवला. माझ्या पतीची चौकशी वाझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. तसेच हिरने यांची गाडीही चार महिने वाझेंकडेची होती, असं हिरेन यांच्या पत्नीने म्हटलं आहे. त्यामुळे वाझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वाझे यांना कोण वाचवतंय? असा सवाल करतानाच हिरेन यांची हत्या गाडीतच करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.

विमला हिरेन यांच्या संशयानुसार हिरेन यांची हत्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी केली आहे. त्यामुळे वाझेंना तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब फडणवीसांनांनी वाचून दाखवला. एटीएस याबाबत तपास करुन सत्य समोर आणेल. त्यांच्याकडे काही पुरावे असेल, तर एटीएसकडे द्यावे. राज्य सरकार योग्य तपास करेल, कोणालाही पाठिशी घालणार नाही. शब्द देतो. जे कागदपत्रे आहेत, ती माझ्याकडे किंवा एटीएस कडे द्या. तपास योग्य होईल असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणाची SIT चौकशी करणार : अनिल देशमुख

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासदार मोहन डेलकर प्रकरणावर निवेदन दिले. खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या दबावातून झाल्याचे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा केली.

मोहन डेलकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये काही नावे लिहिली होती. या सुसाईड नोटमधील काही खुलासे अनिल देशमुख यांनी विधानसभेत केले. यावेळी प्रफुल खेडा पटेल नावाचा उल्लेख केला. प्रफुल खेडा पटेल हे गुजरातचे गृहमंत्री होते. ते डेलकर यांना त्रास देत होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते, असे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी 2017 साली मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक (case) प्रकरण दाबले. आता त्यांच्या पत्नीच्या विनंतीवरून ठाकरे सरकार याप्रकरणाची चौकशी करत आहे. सचिन वाझे याप्रकरणाचा तपास करत होते. ते पदावर कायम राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकजण अडचणीत येतील. त्यामुळे भाजपकडून सचिन वाझे यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला.

यावर देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. ही गोष्ट भास्कर जाधव यांना माहिती नसेल. तुम्ही मला धमक्या देऊ नका. मी धमक्यांना घाबरत नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.त्यानंतर विरोधी आमदारांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन सभागृहात गदारोळ माजवला.

दरम्यान आज विधानसभेतील गदारोळामुळे 9 वेळा सभागृह तहकूब करण्यात आला. तर शेवटच्या गदारोळामुळे उद्या सकाळपर्यत विधानसभा स्थगित करण्यात आली. याचवेळी नेतेमंडळी सभागृहात गोंधळ घालत असताना पिठासीन अधिकाऱ्यांनी नेत्यांना कोरोनाची आठवण करून दिली. यावेळी त्यांनी गर्दी करून नका, गोंधळ घालू नका असे म्हणत कोविडचा संसर्ग सुरु असल्याची नेत्यांना आठवण करून दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माझी चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचे गृहमंत्र्यांना खुलं आव्हान

Tech Update : व्हॉट्सअ‍ॅप वापरताय ? ही बातमी तुमच्याचसाठी