in

“कोरोनाविरुद्धच्या लढाईत देश आत्मनिर्भर झाला”, पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतानं वर्षभरातच कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आणि जगाला दिली. हे वैज्ञानिकांच्या परिश्रमाचं फळ असल्याचंही मोदी म्हणाले. CSIRने आता समाजाशी संवाद साधून, त्यांच्या सल्ल्यांचा विचार करुन काम करायला सुरुवात केली आहे. CSIRबद्दल लोकांना माहिती मिळायला हवी. आपल्या देशातले वैज्ञानिक, संशोधक कशासंदर्भातलं काम करत आहेत, हे त्यांना सोप्या भाषेमध्ये कळायला हवं. त्यामुळे तशी माहिती उपलब्ध करुन देण्याचा सल्ला मी देत आहे.

देशातल्या वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामगिरीमुळे देश प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. वर्षभरात करोना प्रतिबंधक लस तयार करुन देश आत्मनिर्भर झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. CSIR(Council of Scientific and Industrial research)च्या आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

कोरोनामुळे सध्या आपल्या प्रगतीचा वेग मंदावला असला तरीही आत्मनिर्भर भारत हाच आपला संकल्प आहे. वैज्ञानिकांची करोनाकाळातली परिश्रम करुन आत्मनिर्भर होण्याची भूमिका ज्याप्रमाणे आहे, तशीच भूमिका आपल्याला प्रत्येक क्षेत्रात घ्यायची आहे, असंही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी सर्व वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभारही मानले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अनलॉकच्या गोंधळावर फडणवीस संतापले…

Gold-Silver Price | दोन दिवसांत सोन्याचा भाव हजार रुपयांनी घसरला