in

तीन-चार आठवड्यात येईल कोरोनाची लस; ट्रम्प यांचा मोठा दावा

Share

कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी देशभरात अनेक प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करोनावरील लसीबाबत महत्वपूर्ण दावा केला आहे. तीन-चार आठवड्यात कोरोनावरील लस येईल. तसेच महामारी आपोआप संपुष्टात येईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

पेन्सिलवेनिया येथे मतदारांसोबत चर्चा करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, कोरोनावरील लस बनवण्याच्या आपण अगदी जवळ आहोत. यास आता फक्त तीन किंवा चार आठवडे लागू शकतात, असे महत्वपूर्ण वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान, या विधानाच्या काही तासांआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना लसीसाठी चार किंवा आठ आठवडे लागतील, असे सांगितले होते.

दरम्यान, डेमोक्रेट्स पक्षाने चिंता व्यक्त केली असून डोनाल्ड ट्रम्प सरकारी आरोग्य नियामक आणि वैज्ञानिकांवर लवकरात लवकर कोरोनावरील लस बनविण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

The passenger boat capsized; 7 killed, 14 missing

चंबळ नदीत प्रवासी असलेली बोट उलटली; 14 जणांचा मृत्यू

मोठी बातमी | भारत-चीनच्या सैनिकांमध्ये गोळीबार