राज्य शासनाने केलेल्या चुकांमुळे राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शासनाने योग्य वेळी आवर घातला असता, तसेच काही निर्बंध घातले असते तर बरे झाले असते. अशा शब्दांत भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य शासनावर थेट आरोप केला आहे.
आज सर्वत्र शिवजयंती साजरी होत आहे. गिरीश महाजन आज सकाळी जळगावात शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलेले होते. अभिवादन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अजूनही वेळ गेलेली नाही. अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आताही कडक निर्बंध घातले नाही तर परिस्थिती वाढेल की काय, अशी भीती आहे. त्यामुळे जनतेनेही आपली काळजी घ्यावी, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
Comments
Loading…