in

वाइल्ड कार्ड एण्ट्री घेऊन हा स्पर्धक झाला बाद

‘बिग बॉस मराठी 3’मधील एका सदस्याचा प्रवास कालच संपला. अभिनेता आदिश वैद्य काल बिग बॉसच्या घरातून बाद झाला.आदिश हा बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री घेणारा पहिला सदस्य होता. ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करण्याआधी त्याने ‘गुम है किसी के प्यार में मालिकेचा निरोप घेतला होता. तो आल्याने घरातील अनेक समीकरणं बदलतील, असा अंदाज होता. ‘बिग बॉस मराठी 3’मधील गेल्या आठवड्यात आदिश, मीनल शहा, विकास पाटील व संतोष चौधरी उर्फ दादूस हे चार सदस्य नॉमिनेट झाले होते. या चौघांपैकी कोण घराबाहेर जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

त्यानुसार, आदिशचा बिग बॉस मराठीच्या या पर्वातील प्रवास संपुष्टात आला. ‘त्याचा प्रवास सुरू होण्याआधीच संपला. केवळ दादूसला वाचवण्यासाठी बिग बॉस तुम्ही चुकीचं खेळलातं, जनता तुमच्यावर नाराज आहे. अशा शब्दांत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र तो बाद होताच, बिग बॉस मराठीच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

आदिश वैद्य हा मराठी आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतला एक प्रसिद्ध चेहरा आहे. आदिशने ‘कुंकू, टिकली, टॅटू’ या मराठी मालिकेत काम केलं होतं. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत देखील तो महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. नागिन, जिंदगी नॉट आउट या मालिकेतही आदिश दिसला होता.कतीच आदिशने ‘गुम है किसी के प्यार में’ या हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बालविवाहाचा बळी; कमी वयात लग्न आणि मातृत्वाने तिचा जीव गेला!

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; NCBची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली!