in

5 जी नेटवर्कमध्ये जिओला टक्कर देण्यासाठी ‘ही’ कंपनी बाजारात

एकीकडे चीन आणि अमेरिका पहिले 6 जी इंटरनेट सेवा कोण लाँच करणार यासाठी स्पर्धा करत आहे तर, दुसऱीकडे भारतात रिलायन्स आणि एयरटेलमध्ये कोण पहिले 5जी सेवा लाँच करणार याची चढाओढ सुरू आहे. मुकेश अंबानी यांनी सहा महिन्यात रिलायन्स जिओ 5 जी लाँच करणार आहे, अशी घोषणा केली होती त्यानंतर बाकी कंपन्यांनीही कंबर कसली आहे. यात आता एयरटेल जिओला टक्कर देण्याच्या तयारीत आहे.
भारतात एयरटेल लवकरचं 5जी सेवा लाँच करणार आहे. यासाठी एयरटेलने क्वालकॉम टेक्नॉलॉजी कंपनीसोबत करार केला आहे. आज (मंगळवारी) यासंदर्भातील माहिती शेअर बाजारात देण्यात आली. यासह इंटरनेट नेटवर्कही अपग्रेड करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे बाजारात एअरटेल vs जिओ अशी लढाई सुरु झाली आहे
चीनने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 6G ट्रांसमिशनसाठी एअरवेव्हजच्या टेस्टिंगसाठी एक सॅटेलाईट देखील लाँच केल्याचे अहवालात म्हटले आहे. आता चीनची कंपनी ZTE ने देखील यूनिकॉम हाँगकाँगसोबत मिळून 6G वर काम करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे भारतात 2021च्या अखेरीस 5जी च्या स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. तेव्हा आता भारतात नेमकं कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Virus : महाराष्ट्रात विषाणूचे दोन प्रकार आढळल्याची निती आयोगाची माहिती

पोहरादेवी गडावरील गर्दीवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी- मुख्यमंत्री