in

पुण्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात कंपनीला आग

पुण्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सकाळी 11.30 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.

पुणे जिल्ह्यातील सणसवाडी परिसरातील एमआयडीसी मधील सिंटॅक्स या कंपनीत शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. औद्योगिक वापरासाठी लागणारे प्लास्टिकचे पार्टस तयार करणारी ही कंपनी आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य निर्माण झालं आहे. आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्र्यांना चिंता फक्त स्वतःची; मुंबई पाण्याखाली गेली तरी काय?

संध्याकाळी ६ ते सकाळी ९ पर्यंत नाईट कर्फ्यूचा विचार : विजय वडेट्टीवार