in

पाहा अर्थसंकल्पात कोणत्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मिळणार निधी…

आज राज्याचा अर्थसंकल्प महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी आरोग्य सेवेसाठी 7 हजार 200 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच ५ हजार कोटी आरोग्य विभागासाठी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य विभागास यंदा २९०० कोटी रुपये सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. तर वैद्यकीय शिक्षण विभागास १५१७ कोटी देणार आहेत तर प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

त्याच प्रमाणे प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी काही मंदिराची निवड करण्यात आली आहे. प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी आठ मंदिरांची निवड करण्यात आली आहे, त्यासाठी १०१ कोटी रुपयांची तरतूद राज्यातील परळी-वैजनाथ, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी विशेष निधी दिला जाणार असून, जेजुरीगडासाठी, सांगलीतील बिरुदेव देवस्थानाच्या विकास आराखड्यासही निधी देणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकासालाही पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला जाणार. नामदेव महाराजांच्या नरसी नामदेवच्या विकासाला पुरेसा निधी त्याचबरोबर बसवेश्वरांचे मंगळवेढ्यात स्मारक उभारणार. पोहरादेवीच्या विकासाच्या कामास हवा तेवढा निधी देऊ अशी घोषणा पवार यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात दारू महागणार… उत्पादन शुल्कात वाढ

”चोराच्या उलट्या बोंबा” ; जयंत पाटील यांचा फडणविसांना टोला