in

लोकल प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी;केली ‘ही’ घोषणा…

Share

लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेवर 40 अधिक फेऱ्या वाढवण्यात आली आहे. याआधी 162 फेऱ्या होत होत्या मात्र तरीही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांची गैरसोय होत असल्याने फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेने या संदर्भातील माहिती दिली आहे.

मुंबईत वाढता कोरोनाच संसर्ग पाहता लोकल सेवा बंद करण्यात आली होती. या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बस मधून जाण्याची परवानगी होती. मात्र वेळेचा अपव्यय व सामाजिक अंतराचे उल्लंघन होत असल्याने फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यामध्ये आधी 162 फेऱ्या धावत होत्या, यामद्ये आता वाढ करत 40 आणखी फेऱ्या वाढवण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. चर्चगेट ते बोरिवली दरम्यान अप आणि डाउन मार्गावर एकूण २० फेऱ्या, बोरिवली ते बोईसर दरम्यान दोन फेऱ्या, विरार ते बोरिवली दरम्यान दोन फेऱ्या आणि १४ फेऱ्या चर्चगेट ते विरार दरम्यान होतील. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर अपघात; दोघे जागीच ठार

या’ गोष्टी संभाळल्या तर कधीच प्रेमात ब्रेकअप होणार नाही