in

हवाई दलात आणखी 16 राफेल विमानं होणार दाखल

Share

भारताने फ्रान्सला ३६ राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यातील पाच विमाने २९ जुलै रोजी अंबाला एअरबेसवर दाखल झाली. फ्रान्स ते भारत या प्रवासात अबू धाबीमधील अल धाफ्रा येथील एअर बेसवर ही विमाने एकदिवस थांबली होती. १० सप्टेंबरला राफेल विमाने औपचारिकरित्या समारंभपूर्वक इंडियन एअर फोर्सचा भाग झाली. दरम्यान, आता भारतीय हवाई दलाची क्षणता आणि ताकद आणखी वाढणार आहे.

१६ Omni- role राफेल जेट लढाऊ विमानं एप्रिल २०२१ पर्यंत भारतीय हवाई दलात सामील होणार आहेत. भारतातही जेट इंजिन आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्रीची निर्मिती करण्याचं काम सुरू करणार असल्याची माहिती फ्रान्सची सर्वात मोठी जेट इंजिन तयार करणारी कंपनी सफरानकडून देण्यात आली.

नोव्हेंबर महिन्यानंतर जानेवारी महिन्यात तीन राफेल विमानं भारतात पोहोचणार आहेत. त्यानंतर मार्च महिन्यात तीन आणि एप्रिल महिन्यात सात राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील होती. यानंतर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात २१ सिंगल सिटर राफेल फायटर जेट आणि सात ट्वीन सीट राफेल फायटर जेट असतील. सर्व लढाऊ विमानं हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मीका क्रुझ क्षेपणास्त्र आणि हवेतून हवेत मारा करणाऱ्या उल्का या क्षेपणास्त्रांसह सज्ज आहेत.

भारताने आता सफरानला हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मॉड्यूलर शस्त्रास्त्रासाठी २५० किलो वॉरहेडची विनंती केली आहे. तर दुसरीकडे सफारानने ‘स्नेक एम ८८’ इंजिन भारतात तयार करण्याची ऑफर दिली आहे.

राफेल या लढाऊ विमानांमध्ये ना केवळ एम-८८ या इंजिनचा वापर केला जाऊ शकतो, तर डीआरडीओद्वारे विकसित करण्यात आलेल्या लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट मार्क २ आणि ट्वीन इंजिन अॅडव्हान्स्ड मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्टदेखील तैनात केलं जाऊ शकतं. भारतीय हवाई दलानं 83 LCA मार्क IA जेट्स खरेदी करण्याची योजनाही तयार केली आहे. जून १९९७ मध्ये रशियन सुखोई-३० विमाने भारतीय हवाई दलाला मिळाली. त्यानंतर २३ वर्षांनी नवीन लाढाऊ विमानं दवाई दलाच्या ताफ्यात दाखल झालं आहे. सध्या चीन बरोबर प्रचंड तणाव असलेल्या लडाख क्षेत्रातही, गरज पडल्यास राफेल विमानांचा वापर करण्यासाठी आयएएफ सज्ज आहे. चीनच्या चिथावणीखोर कृत्यांमुळे इथे लष्कर हाय-अलर्टवर आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

काश्मीरमधून कलम 370 हटवून काय केलं? संजय राऊतांचा भाजपाला थेट सवाल

मराठी भाषेची चीड येते म्हणणाऱ्या जान कुमारला मनसेचा इशारा