in

पोहरादेवी गडावरील गर्दीवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी- मुख्यमंत्री

वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या समर्थकांनी आज वाशिममधील पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लघन झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश दिले.

मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेला संबोधित करताना, सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नसल्याचे सांगितले होते.त्यांनतर आज संजय राठोड यांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर जाऊन दर्शन घेतलं.तसेच तेथे पत्रकार परिषद सुद्धा घेतली. यावेळी संजय राठोड यांच्या समर्थकांनी तुफान गर्दी केली होती.

सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत अनेक बातम्या माध्यमात आल्या आहेत. या सर्व बातम्यांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

5 जी नेटवर्कमध्ये जिओला टक्कर देण्यासाठी ‘ही’ कंपनी बाजारात

चिंताजनक ! राज्यात सोमवारच्या तुलनेत आणखी हजार रुग्णांची वाढ