in

एकेरीत उल्लेख करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे नारायण राणेंनी मानले आभार!

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील सत्ता मिळविण्यासाठी ‘एकच लक्ष्य’ अशी घोषणा पूर्वी शिवसेनेची होती. भाजपाची साथ सोडून सत्ता मिळविणाऱ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी सूत्रे हाती घेतली. पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते असलेले आणि विद्यमान भाजपा खासदार नारायण राणे यांचे देखील एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. वारंवार एकेरी उल्लेख करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे त्यांनी अलीकडेच आभार मानले.

सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभे राहात असून त्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे. मेडिकल कॉलेजची फाइल परवानगीसाठी राज्य सरकारकडे आल्यानंतर आपण मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन केला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे आपण आभारही मानले आहेत, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली. विशेष म्हणजे, त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांचा आदराने उल्लेख केला आहे.

अमित शहांच्या स्वागतासाठी राणेंकडून सिंधुदुर्गमध्ये जोरदार तयारीही करण्यात आली आहे. शिवसेनेसोबत पुन्हा कधीच युती करणार नसल्याचे सांगतानाच फोडाफोडीच्या राजकारणात भाजपा आणि आमची पीएचडी असल्याचा दावाही त्यांनी केला.

शहांच्या पायगुणावर सत्तांतर अवलंबून
एकूण 105 आमदार येऊनही भाजपाला विरोधी बाकावार बसावे लागले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाऊन भाजपाचे सरकार येईल, असे भाकित राणेनी तीन वेळा केले होते. पण त्यात यश आले नाही. त्यामुळे आता अमित शहांच्या पायगुणाने राज्यात सत्तांतर होईल, असे नारायण राणेंना वाटत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तिरुपती बालाजीसाठी कोल्हापुरातून विमानसेवा पूर्ववत

“मुख्यमंत्री पदाचं स्वप्न नेत्यांनी नाही जनतेनं पहावं लागतं…”