ठाणे महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना गुरुवारी संध्याकाळी लाचलुचपत खात्याच्या पथकाने ५ लाख रुपये घेताना अटक केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून डॉ. राजू मुरुडकर हे ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख असून त्यांनी १५ लाखाची मागणी केली होती. त्यापैकी ५ लाख रुपये घेताना ऐरोली येथून लाचलुचपत खात्याने सापळा लावून त्यांना अटक केली.
मुरुडकर यांनी एका कंपनीकडून 15 लाख रुपयांची मागणी केली होती. ती कंपनी ठाणे महानगरपालिकेला व्हेंटिलेटर पुरवणार होती. एकूण कंत्राट 1.5 कोटींची होते. त्याचे दहा टक्के लाच म्हणून मुरूडकर यांनी मागितले होते. एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऐरोली येथे हा व्यवहार होणार होता. त्याआधीच लाचलुचपत विभागाने तिथे सापळा रचून मुरुडकर यांना अटक केली.
Comments
Loading…