संदीप गायकवाड | राज्यात सत्तेते असणारे ठाकरे सरकार हे माफिया आणि घोटाळे करणाऱ्यांचे सरकार असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच एकमेकांच्या मंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नालासोपाऱ्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, कोरोना काळात उध्दव ठाकरेंच्या बिल्डर मिञाची अडीज कोटीची जागा महापालिकेने ९०० कोटीला जादा दराने विकत घेतल्याचा आरोप करुन, उध्दव ठाकरे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधातील याचिकेची सुनावणी आता लवकरच होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितलं.
वसई-विरार महापालिकेत फूटामागे दीडशे रुपये झेड झेड फंड गोळा केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. पिण्याच्या पाण्याची समस्या वसईतून दूर झालीच पाहिजे तो पर्यंत भाजपा गप्प बसणार नाही. भाजपा वसई-विरार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करत आहोत आपण 365 दिवसाची पाणी पट्टी भरूनही पिण्याचे पाणी 4 ते 5 दिवसांनी येत आहे या विरोधात महानगरपालिकेवर पाण्यासंदर्भात घेणाऱ्या हंडा कळशी मोर्चाचे नेतृत्व स्वतः करणार असल्याचे किरीट सोमया यांनी सांगितले. या मोर्चाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, आमदार व निवडणूक प्रभारी प्रसाद लाड हे उपस्थित राहणार आहे.
तसेच राज्यात सात लाख ग्राहकांनी वीज बिल भरले नाही म्हणून ठाकरे सरकारने त्यांचे वीज कनेक्शन कापल्याने सामान्य नागरिकांची दिशाभूल होत आहे. या विरोधात 26 फेब्रुवारीला राज्यभरात भाजपाचे बत्तीगुल जेलभरो आंदोलन असणार असल्याचेही सांगितले आहे..
Comments
Loading…