in

अंधेरीच्या एमआयडीसीत कंपनीला भीषण आग

लोकशाही न्यूज नेटवर्क | मुंबईच्या अंधेरी एमआयडीसीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमण दलाला यश आले आहे.

सिप्ज कंपनीच्या तारा ज्वेलर्स कंपनीला रात्री जवळपास 2 वाजता आग लागली होती.कंपनीच्या बेसमेंटमध्ये आग लागली, याची माहिती सिक्युरिटी गार्डने पोलिसांना दिली. ही कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली.

याघटनेची माहिती मिळताच 6 अग्निशामक दलाच्या गाड्या आणि 10 फायर इंजिन घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. शॉर्ट सर्किटमुळे ही लागल्याची माहिती आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Diesel Price : जाणून घ्या पेट्रोल – डिझेलचे आजचे दर

न्यायमूर्ती थेट राजकीय पक्षांचे शिलेदारच बनलेत; ‘सामना’तून हल्लाबोल