in

मीरा रोडमध्ये मध्यरात्री सिलिंडरचा भीषण स्फोट

लोकशाही न्यूज नेटवर्क | मीरा रोडमध्ये मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेत जवळपास 12 स्फोट झालं असल्याची स्थानिक नागरिक सांगत आहेत. स्फोटाच्या या घटनेने स्थानिक नागरिक हादरले आहेत. दरम्यान स्फोटामुळे लागलेली आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली आहे.

मीरा रोडच्या राम नगर येथील शांती गार्डन, सेक्टर नंबर 5 येथील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीत सिलेंडरचे स्फोट झाले. आजूबाजूला दोन सिलेंडरने भरलेल्या गाडया होत्या त्या दोन्ही गाड्यांना आग लागली होती. आणि त्यातील भरलेल्या सिलेंडरचे रात्री दोन वाजल्यापासून एकामागून एक स्फोट होतं होते. जवळपास 12 स्फोट झाले असल्याचे स्थानिक बोलत आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या इमारतीच्या घरांच्या काचा फुटल्या आहेत.

या घटनेची माहिती मिळताच मीरा भाईंदर अग्निशमन दलाच्या सात गाड्या, दोन टॅंकर, एक टिटीएल गाडी, तसेच 54 जवान घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी साधारण एक तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या घटनेत दोनजण किरकोळ जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसेच या सिलेंडरच्या स्फोटामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नौदल अधिकारी अपहरण प्रकरणात ‘ट्विस्ट’; मृत्यूचं गूढ उलगडलं!

Petrol Diesel Price : जाणून घ्या पेट्रोल – डिझेलचे आजचे दर