in ,

विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत तणाव

लोकशाही न्यूज नेटवर्क

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लावायची यावरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे.

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे बोलले जात आहे तर शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीमध्ये अविश्वास निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. संभाव्य प्रदेशाध्यक्षपदाच्या यादीत नाना पटोले यांचे नाव आघाडीवर होते.


विधानसभा अध्यक्ष कोण असणार?
विधानसभा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे विधानसभा अध्यक्षाचे पद हे काँग्रेसकडे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर दावा करण्याचे संकेत दिले आहेत.

कोणाच्या नावाची शक्यता?
नाना पटोले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार
आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना विधानसभेचे अध्यक्षपद
विधानसभा अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीही दावा करणार
काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार व ते पद बाळासाहेब थोरात यांना देणार अशीही चर्चा

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जनतेच्या खिशात काही टाकत नाहीत, आहे ते तरी कशाला ओरबडता…? शिवसेनेच्या सामनातून केंद्र सरकारला सवाल

PNB Scam: मेहुल चोक्सीवर ED ची मोठी कारवाई