in

सामना सुरू होण्याआधीच टीम इंडियाला धक्का; अक्षर पटेल दुखापतग्रस्त

लोकशाही न्यूज नेटवर्क

आज, शुक्रवारपासून एम. ए. चिदम्बरम (चेपॉक) स्टेडियमवर सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच भारतीय संघाला धक्का बसला आहे.


ऑस्ट्रेलियात दुखापतीची मालिका सुरु असतानाच चेन्नईतील या पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या गोलंदाजानं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. बीसीसीआयनं केलेल्या ट्विट करुन माहिती दिली आहे. अष्टपैलू अक्षर पटेल याला दुखापत झाल्यामुले पहिल्या कसोटीला मुकणार आहे. अक्षर पटेलऐवजी संघात शाबाज नदीम आणि राहुल चहर या दोन फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. पदार्पणाची संधी मिळण्याआधीच अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा दुखापतग्रस्त खेळाडूंची चर्चा सुरु झाली आहे.

कोरोनाच्या नियमांमुळे या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत खेळवले जाणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खुलासा! एका व्यक्तीच्या PF खात्यावर १०३ कोटी रुपये तर १.२३ लाख खात्यांमध्येच आहेत ६५,५०० कोटी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर