in

Tech Update : Twitter वरील टिव टिव आता ऐकायलाही मिळणार

सोशल मिडीयाच्या माध्यमांमध्ये ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे ट्विटर नेहमीच वेगवेगळे बदल करत असते. असाच एक बदल ट्विटरने केला आहे आता ट्विटरवर डायरेक्‍ट मेसेजेसमधील (डीएम) व्हॉईस मेसेजेस् किंवा व्हॉईस मेसेज पाठवण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. या संदर्भात ट्विटर चाचणी करत असून, हा प्रयोग भारतीयांसाठी टप्प्याटप्याने करण्‍यात येणार आहे. ही सेवा भारत, जपान व ब्राझीलमधील आयओएस व अँड्रॉईडचा वापर करणाऱ्या लोकांसाठी ट्विटरवर उपलब्‍ध असणार आहे.

”भारत ही ट्विटरसाठी प्राधान्‍य बाजारपेठ आहे. त्यामुळे भारतात सातत्‍याने नवीन वैशिष्‍ट्यांची चाचणी घेत आहोत. आम्‍ही देशात डीएम प्रयोगामध्‍ये व्हॉईस मेसेजेस् सुविधा आणण्‍यासाठी प्रयत्न करत आहोत.प्रत्‍येक व्हॉईस मेसेज जवळपास 140 सेकंदांचा असू शकतो आणि चालता-फिरता किंवा अधिक प्रमाणात मेसेज टाइप करण्‍याची गरज असताना जलदपणे चॅटिंग करण्‍यामध्‍ये मदत करू शकतो. टेक्‍स्‍ट मेसेजच्‍या माध्‍यमातून अनेक गोष्‍टी सांगण्‍याच्‍या राहू शकतात किंवा त्‍यामध्‍ये अडथळा येऊ शकतो. अशी माहिती ट्विटर इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक मनिष महेश्‍वरी यांनी दिली आहे.

डीएममध्‍ये व्हॉईस मेसेज कसा पाठवावा?

  • हँड्स-फ्री अनुभवासाठी डीएम संवादामध्‍ये रेकॉर्डिंगला सुरुवात करण्‍याकरिता एकदाच नवीन व्हॉईस रेकॉर्डिंग आयकॉनवर टॅप करा. मेसेज बोलून झाल्‍यानंतर स्‍टॉप आयकॉनवर टॅप करा.
  • आयओएसवर तुम्‍ही व्हॉईस रेकॉर्डिंग आयकॉन धरून राहत जलदपणे मेसेज पाठवू शकता आणि बोलून झाल्‍यानंतर त्‍वरित मेसेज पाठवण्‍यासाठी स्‍वाइप अप करू शकता.
  • डीएमवर व्हॉईस मेसेजेस् रेकॉर्ड करण्‍याची सुविधा फक्‍त भारत, जपान व ब्राझीलमधील आयओएस व अँड्रॉईडचा वापर करणाऱ्या लोकांसाठी ट्विटरवर उपलब्‍ध असणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘कोर्टात बघून घेईन,’ ही धमकी नाही अन् गुन्हा देखील नाही!

आता शेतकऱ्यांची देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलनाची हाक