in ,

‘नॉट सो सस्ती एनीमोअर…’; प्राप्तिकराच्या छापेमारीबद्दल तापसी पन्नूने सोडले मौन

प्राप्तिकर विभागाने बॉलिवूडमधील बड्या हस्तींविरोधात छापेमारी सुरू केली आहे. अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप, निर्माता विकास बहल, सिनेवितरक मधू मंटेना यांच्यावर ही कारवाई सुरू आहे. यासंदर्भात तापसीने पहिल्यांदाच मौन सोडले असून तिने ट्विट करत ‘नॉट सो सस्ती…’ असे म्हटले आहे.

या प्रकरणात प्राप्तिकर विभागाने मुंबई, पुणे, दिल्ली आणि हैदराबाद येथे छापेमारी केली. शुक्रवारी रात्री पुण्यात तापसी आणि अनुराग यांची प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या चौकशीनंतर तापसीने सलग तीन टि्वट केले आहेत. या ट्विटद्वारे तिने तीन मुद्दे मांडले आहेत. या सर्वांनी फॅंटम चित्रपटाची निर्मिती केली होती.

“3 दिवसांच्या शोधात प्रामुख्याने 3 गोष्टींचा समावेश आहे. 1. पॅरिसमधील माझ्या मालकीचा असलेला ‘कथित’ बंगला कारण की, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. 2. मी याआधीच नाकारलेल्या 5 कोटी रकमेची “कथित” पावती. 3 सन्माननीय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या वृत्तानुसार 2013मधील माझ्यावर टाकलेल्या छाप्याची आठवण,” असे ट्विट तिने केले आहे. याचबरोबर ‘नॉट सो सस्ती एनीमोर’ असेही तिने म्हटलं आहे.

निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरांवर आणि कार्यालयावर टाकलेल्या छाप्यांबाबत प्रतिक्रिया दिली. 2013मध्ये या लोकांवर अशीच कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी इतकी चर्चा करण्यात आली नाही. तर मग आता का? असा सवाल त्यांनी केला.

रिजीजूंना लक्ष घालण्याची विनंती

भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देणारा तापसी पन्नूचा बॉयफ्रेन्ड मॅथियस बोई याने सुद्धा याबाबत ट्विट करत केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांना यात लक्ष घालण्यास सांगितले. या सर्व प्रकारामुळे घरामध्ये उगाच तणाव निर्माण झाला असल्याते त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याच्या या ट्विटला किरेन रिजीजू यांनी उत्तर दिले आहे. आपल्या कर्तव्यासोबत एकनिष्ठ राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ind Vs. Eng : भारताचा सर्व बाद 365 धावा, वॉशिंग्टन सुंदरचे शतक हुकले

महत्त्वाची बातमी : रेल्वे आरक्षण प्रणाली रात्रभर राहणार बंद, कारण…