in

हसन अखुंड होणार अफगाणिस्तानचा पंतप्रधान?

अफगाणिस्तानमध्ये सरकार बनवण्याच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्या तालिबानने आपल्या सर्वोच्च नेत्याचं नाव जवळजवळ निश्चित केलं आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंडला देशाचा सर्वोच्च नेता म्हणजेच अफगाणिस्तानच्या पंतप्रधान पदी बसवलं जाणार आहे. तसेच दोन उपपंतप्रधानही नियुक्त करण्यात येणार असून मुल्ला बरादर आणि मुल्ला अब्दुस सलाम यांची या पदांवर वर्णी लागणार आहे. सुत्रांनी सीएनएन-न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार मुल्ला अखुंडजादाने मोहम्मद हसन अखुंडचे नाव या पदासाठी सुचवलं आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमधील प्रत्येक माहिती जागतिक स्तरावरील प्रसारमाध्यमांना देणारा जबीउल्लाह मुजाहिदीन हा अखुंडचा अधिकृत प्रवक्ता म्हणून काम करणार आहे.

सिराज जुद्दीन हक्कानीकडे अफगाणिस्तानच्या गृहमंत्रीपदाची जबाबादारी देण्यात येणार आहे. हक्कानीच सर्व राज्यपालांची नावं निश्चित करणार आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना असणाऱ्या आयटएसआयचे प्रमुख हामिद फैज यांनी केलेल्या काबूल दौऱ्यामध्येच सरकारच्या बांधणीसंदर्भात सुरुवातीचं काम झाल्याचं सांगण्यात येतं आहे. हक्कानीला सरकारची मोट बांधण्यासाठी फैज यांनी मदत केल्याचं सांगण्यात येते. तालिबान आणि अफगाणिस्तान लष्करामधील संघर्षामध्ये लष्कराचं फार नुकसान झालं. आयएसआयने हक्कानी नेटवर्कला सुरक्षा पुरवल्याचं सांगितलं जातं. हक्कानी हा अलकायदाशी संबंध असणारा गट आहे. संयुक्त राष्ट्रांबरोबरच अमेरिकेनेही हक्कानी गटाला दहशतवादी गट म्हणून जाहीर केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Monsson Update | मुंबई, ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट

केकत जळगाव येथे बिबटयाचे दर्शन!