in

Afganisthan | पंजशीरवर तालिबान्यांचा ताबा !

तालिबान्यानी 20 वर्षानंतर अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. या सर्वामध्ये अफगानिस्तानचा पंचशीर (panjshir) हा भाग तालिबान्यांच्या हातता गेला नव्हता. परंतू आता पंजशीर हा भाग तालिबान्यांच्या ताब्यात गेला आहे. तालिबान आणि नॉर्दन अलायन्स तसेच माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह (amrullah saleh) यांच्या फौजांमध्ये सुरु असणारं युद्ध संपुष्टात आल्याची घोषणा तालिबानने केलीय. पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केलाय.

या दाव्यामध्ये त्यांनी पंजशीरच्या खोऱ्यात आम्ही हा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. याच विजयासोबत अफगाणिस्तानमधील संपूर्ण युद्धविराम लागल्याची घोषणा तालिबानने जारी केलेल्या पत्रकात केलीय. “आमच्या शत्रूच्या ताब्यात असणारा पंजशीर प्रांत आम्ही पूर्णपणे ताब्यात घेतलाय. देवाने आणि देशाने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर देशातील प्रत्येक प्रांताला सुरक्षा पुरवण्यासाठी आम्ही करत असणाऱ्या या प्रय़त्नांना यश आलं आहे,”असं पत्रकात म्हटलं आहे.

नॉर्दन अलायन्ससाठी लढणाऱ्या अनेकांना आम्ही मारहाण केली तर बरेच जण पळून गेल्याचा उल्लेखही या पत्रात आहे. तसेच पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सच्या दबावाखाली असणाऱ्या स्थानिकांची सुटका करण्यात आम्हाला यश आल्याचा आनंद आहे, असा दावाही तालिबानने केलाय. “त्यांची सुटका करण्यात आली आहे. तसेच पंजशीरमधील सर्व नागरिकांचा सन्मान केला जाईल. त्यांच्याशी दुजाभाव केला जाणार नाही. ते सर्वजण आमचे बांधव आहेत. आमच्या देशाची सेवा करणं हे आमचं समान उद्दीष्ट आहे. या नुकत्याच मिळालेल्या विजयामुळे देश युद्धामधून पूर्णपणे बाहेर पडला आहे. आता देशातील नागरिक शांततेत, स्वातंत्र्याच्या वातावरणात आणि मुक्तपणे समृद्धी असणारं जीवन जगतील,” असा विश्वास तालिबानने व्यक्त केलाय.

तालिबानने पंजशीरचा प्रांत वगळता संपूर्ण अफगाणिस्तावर १६ ऑगस्टपासून ताबा मिळवला. पंजशीरमध्ये मागील सोमवारपासून तालिबान आणि नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांमध्ये युद्ध सुरु झालं होतं. तालिबानच्या शेकडो सैनिकांनी मंगळवारी रात्री म्हणजेच ज्या दिवशी अमेरिकेने अफगाणिस्तान सोडलं त्या रात्री पंजशीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तालिबानने येथील एक पूल सुद्धा स्फोट करुन उडवला. नॉर्दन अलायन्सकडून लढणाऱ्यांची कोंडी करण्यासाठी तालिबानने हा पूल उडवल्याचं सांगण्यात आलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नितेश राणेंचं जावेद अख्तर यांना चर्चेसाठी खुले आव्हान, पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

केरळचा ऑटो ड्रायव्हर सोशल मीडियावर तुफान व्हायरल