in

भाजपाचे महावितरण विरोधात ताला ठोको, हल्ला बोल आंदोलन

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यभरात आज भाजपा आणि शिवसेना आमने सामने पाहिला मिळणार आहेत. वाढीव वीज बिलाबाबत भाजपानं आंदोलन पुकारलं असून त्यासाठी भाजपाचे नेते वेगवेगळ्या शहरांमध्ये ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करणार आहेत. बावनकुळेंच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सरकार जनतेशी बेईमानी करतयं. ठाकरे सरकार हे कमिशनवर आले आहे. भाजपा हे वीज कनेक्शन कापू देणार नाही. असे बावनकुळे आंदोलना दरम्यान बोलत आहेत.

नागपूर महावितरण विरोधात आज भाजपाकडून जिल्हाभर बिलांची होळी करत हल्ला बोल आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील 75 लाख विज ग्राहकांनी कोरोना काळात विजबिल भरले नाही म्हणुन विज कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा जवळपास 5 कोटी पेक्षा जास्त नागरीकांना अंधारात ठेवण्याचे षडयंत्र केल. महावितरणच्या या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज नागपूरमध्ये सहा विधानसभा क्षेत्रात आंदोलन केलं जात आहे.

इंधन दरवाढीविरोधात शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या सततच्या दरवाढीविरोधात शिवसेनेचं राज्यभर आंदोलन सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्यांना आधीच काही मिळाल नाही तर मग ही लोक पैसे कसं भरणार. 72 लाखांची वीज कनेक्शन तोडणार असेल तर याचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे, असं भाजपचं म्हणणं आहे. म्हणून भाजप आज राज्यभर या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर

पंतप्रधान मोदींच्या सख्ख्या पुतणीला गुजरात भाजपानं नाकारलं तिकीट