in

10वी, 12वीची परीक्षा जूनमध्ये घ्या! राज्य शिक्षक सेनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

कोरोनाचं संक्रमण आणि वाढत्या रुग्णसंख्येला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. हे निर्बंध मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून लागू झाले आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी आणि आठवड्याच्या शेवटी संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कोरोना रोखण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू करण्यात आल्याने विद्यार्थीहित लक्षात घेता दहावी, बारावीच्या परीक्षा जून महिन्यात घेण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे.

राज्यात जमावबंदीचा आदेश असल्याने पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. त्यातच दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू होणार असल्याने परीक्षा केंद्रावर सरासरी 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. त्यामुळे सरासरी 500 विद्यार्थ्यांचे केंद्र असलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रावर नियमानुसार परीक्षा देता येणार नाही. याशिवाय शनिवारी संचारबंदी असल्याने या दिवशी परीक्षा घेता येणार नाही. ही सर्व स्थिती शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी वर्षा गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच दहावी, बारावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्याविषयी तातडीने निर्णय घेण्याची मागणीदेखील केली आहे.

जूनमध्ये परीक्षा घेताना परीक्षेचा कालावधी कमी करून दिवसाला दोन पेपर्स घेण्यात यावेत, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही परीक्षा घेण्यात यावी तसेच उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर करून जुलैअखेरपर्यंत निकाल जाहीर करावा अशी मागणीही शिक्षक सेनेच्या वतीने वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

West Bengal Election | मतदानापूर्वी नेत्याच्या घरी सापडलं EVM आणि व्हीव्हीपॅट मशिन

IPL 2021 | वानखेडे स्टेडियममध्ये सामने नको; स्थानिकांच मुख्यमंत्र्यांना पत्र