in

T20 World Cup विराट कोहली कर्णधारपद सोडणार

आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपले कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेवर पडदा पडला आहे. विराट कोहलीने ट्विटरवरून टी 20 विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती दिली आहे.

विराट कोहली सध्या फलंदाजीत अपयशी ठरताना दिसत होता. गेल्या अनेक सामन्यात तो मोठी खेळी साकारण्यास तो अपयशी ठरला होता. त्यामुळे विराटने आपल्या फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

विराटच्या जागी रोहित शर्माकडे टी 20 आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा दिली जाऊ शकते. गेल्या काही दिवसांत विराट कोहलीने या विषयावर संघ व्यवस्थापन आणि रोहित शर्मासोबत अनेकदा चर्चा केल्याची माहिती आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रातील दोन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार

Corona Vaccine : मुंबईत उद्या फक्त महिलांचे लसीकरण होणार