in

पाकिस्तान विरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाच बिघडलं गणित

AHMEDABAD, INDIA - MARCH 14: Bhuvneshwar Kumar of India celebrates after taking the wicket of Jos Buttler of England with team mates during the 2nd T20 International match between India and England at Narendra Modi Stadium on March 14, 2021 in Ahmedabad, India. (Photo by Surjeet Yadav/Getty Images)

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाला स्पर्धा अजून कठीण जाण्याची शक्यता आहे. यासाठी उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारत संघाला प्रचंड घाम गाळावा लागणार आहे. आता यापुढचे आव्हान टीम इंडियासाठी अवघड असण्याची शक्यता असल्यामुळे मोठ्या स्पर्धांमध्ये कमकुवत संघही आता बाजी मारतात. टीम इंडिया स्पर्धेच्या २ गटामध्ये आहे. तर भारताला आता आपला सामना न्यूझीलंडविरुद्ध पुढील रविवारी खेळायचा आहे.

भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड तसेच नामिबियाचे संघ आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघाला किमान ४-५ सामने जिंकावे लागतील. आणि या ६ संघांपैकी फक्त २ अव्वल संघांना उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळणार. या व्यतिरिक्त, प्रकरण नेट रनरेटवर देखील अडकू शकते.

टीम इंडियाला आपला सामना न्यूझीलंडविरुद्ध पुढील रविवारी खेळनार असून, ३ नोव्हेंबरला टीम इंडियाची अफगाणिस्तानशी भिडेल आणि मग न्यूझीलंड, अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर भारत पहिल्या फेरीतून पुढे जाणार. त्यानंतर स्कॉटलंड आणि नामिबिया संघांशी खेळनार. फक्त दोनच संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाला फक्त त्याचे उर्वरित सर्व सामने जिंकण्या बरोबरच मोठ्या फरकानेही विजय मिळवावा लागेल. नाहीतर टीम इंडियावर उपांत्य फेरीपूर्वीच स्पर्धेतून बाहेर येईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उल्हासनगरमध्ये होणार राजकीय भूकंप, कारण…

उल्हासनगरमध्ये श्रेयवादाची लढाई, भूमिपूजनावरून शिवसेना-मनसे आमनेसामने