in

थकीत वेतनामुळे सफाई कर्मचाऱ्याने नगरपरिषद आवारात घेतला गळफास

लातुर जिल्ह्यातील निलंगा नगरपरिषदेत कंत्राटी तत्वावर साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याने नगरपरिषद आवारात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. बाबुराव नामदेव गायकवाड अस मृत कामगारांचे नाव असून थकीत वेतनामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणी आता मुख्याधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबित करत अटक करावी अशी मागणी केली जात आहे.

गेल्या 32 वर्षापासून बाबुराव गायकवाड हे कंत्राटी तत्वावर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. गेल्या 8 ते 9 महिन्याचे मासिक वेतन देण्यात आले नव्हते. या वेतनासंदर्भात कार्यालयात विचारणा करण्यास गेलेल्या मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील व कंत्राटदाराने त्यांना अपशब्द वापरून हाकलून दिले. त्यामुळे त्यांनी नगरपरिषद आवरात असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती दत्ता गायकवाड यांनी दिली.

दरम्यान वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगर परिषद निलंगा मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे व कंत्राटदार यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत तत्काळ निलंबित करून अटक करावी, अशी मागणी दत्ता गायकवाड यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच संबधित पत्र जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पाठवले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नागपुर अमरावती महामार्गवर कंटेनर अपघातात 40 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू तर 11 जनावरे जखमी

चंद्रपूरमध्ये वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ