नेहमीच तापत स्वरुपाची व्यक्त्याव्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं. हा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत असतानाच असून, चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्ती शिवी दिल्याचा आरोप केला जात आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरल्याने योगींवर टीकाही होत आहे. तर दुसरीकडे योगींना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱी सूर्य प्रताप सिंह यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत टीका केली आहे. ‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा आहे खरा चेहरा. थोडा आवाज झाला म्हणून एएनआयच्या कॅमेरामॅनला शिवी देत आहे. असो एएनआयसोबत असंच व्हायला हवं. देशातील सर्वात मोठी वृत्तसंस्था जेव्हा सरकारी प्रवक्त्यांपेक्षाही जास्त पुढे पुढे केल्या असं होणं साहजिक आहे. संताची भाषा ऐका,”असं सूर्य प्रताप यांनी म्हटलं आहे.
मुंबई युवक काँग्रेसनंही हा व्हिडीओ शेअर केला आहे. “हा आहे अजय बिश्त यांचा खरा चेहरा. एएनआयच्या पत्रकाराला कॅमेऱ्यासमोरच दिली शिवी. साधूच्या वेशात दिसणाऱ्या या तथाकथित योगींच्या डोक्यात भरलेली अमर्यादा, असंस्कृतता आणि खालच्या पातळीवरील शब्दाबद्दल भाजपाला भलेही अभिमान वाटेल, पण देश अपमानित झाला आहे,” अशी टीका युवक काँग्रेसने केली आहे.
Comments
Loading…