in

SushantNoMore : जिच्यासोबत होणार होतं लग्न, तिच्यासोबतच झालं असं काही की…

SushantNOMore: The one I was going to marry, the one I was going to marry
SushantNOMore: The one I was going to marry, the one I was going to marry
Share

बॉलिवूड इंडस्ट्री मधला सगळ्यात फ्रेश आणि हासरा चेहरा म्हणून सुशांतची ओळख होती, ती ओळख आता भुतकाळामध्ये बदलली आहे. सुशांतने केलेल्या आत्महत्येबाबात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत, मात्र या सगळ्यावर पोलिसांनी आपला खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मागे कोणतंही कारण किंवा घातपात नसून ही एक आत्महत्याच आहे. असा दावा पोलिसांनी पोस्टमार्टमच्या आधारावर केला आहे.

सुशांतने आत्महत्या करण्याआधी आपल्या वडिशांशी फोनवरून संवाद साधला होता. त्यावेळेस येत्या नोव्हेंबर महिन्यात मी लग्न करणार आहे, अशीही माहिती त्याने वडिलांना दिली होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून जिच्यासोबत सुशांतचं लग्न होणार होतं, त्या दोघांमध्ये वाद सुरू होता. लॉकडाऊनमध्ये काही काळासाठी ते दोघे एकत्रही राहात होते, मात्र त्यांच्यात झालेल्या वादामुळे सुशांतची गर्लफ्रेंड आपल्या मैत्रिणीसोबत राहाण्यास गेली.

काल रात्री सुशांत आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉमन मित्र असलेल्या महेश भट्ट याचा सुशांतला फोन आला होता, त्यावेळेस सुशांतने फोन उचलला नाही, सुशांतने त्याबदल्यात रात्री 3 च्या सुमारास रिकॉल केला होता, मात्र महेशने त्यावेळेस फोन उचलला नाही, अखेर महेशनेच काल दुपारी बारा वाजता सुशांतला फोन केला होता मात्र वेळ निघून गेली होती. सुशांतच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार याप्रकारची माहिती समोर आली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

sushant singhs dil bechara costar sanjana sanghi posts a heartfelt video on his demise

Sushant Singh Rajput: कोस्टार संजना संघीचा भावुक करणारा व्हिडीओ व्हायरल

The hotel bill of the doctor treating Corona reached the house of crores

कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या हॉटेलचं बील पोहोचलं कोटींच्या घरात