in

म्हणून सुशांतच्या गर्लफ्रेंडवर त्याच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला…

SUSHANT SINGH RAJPUT FIR filed against Sushant Singh Rajput's girlfriend Rhea Chakraborty by actor's father in Patna
Share

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी गेले बरेच दिवस पोलीस चौकशी सुरू आहे; मात्र अद्याप पोलिसांना ठोस अशी दिशा मिळालेली नाही. त्यामुळेच अनेकांची चौकशी अजूनही सुरू आहे. मुंबई पोलीस या केसची चौकशी करत असतानाच आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या वडलांनी आता पटना मधील राजीव नगर पोलीस स्टेशनमध्ये सुशांतच्या कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महिनाभराच्या वर कालावधी लोटला तरी मुंबई पोलिसांना अद्याप चौकशीला एक दिशा मिळाली नाही त्यामुळे सुशांतच्या कुटुंबाने बिहारमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर बिहारवरून चार पोलीस अधिकारी आता मुंबईत दाखल झाले आहेत. हे होत असतानाच सुशांतच्या वडिलांनी याच्याविरोधात गुन्हा दाखल करत या केसला एक वेगळाच ट्विस्ट दिला आहे. काही दिवसांपूर्वी रियाने आपण सुशांतची गर्लफ्रेंड असल्याची कबुली तर दिलीच त्याचसोबत तिने सीबीआय चौकशीची मागणीसुद्धा केली होती. आता थेट रिया विरोधातच गुन्हा दाखल झाल्यामुळे नेमकं काय समोर येतय या केस संदर्भात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

रिया आणि सुशांत एकत्र राहत असून रिया सुशांतचे पैसे खर्च करत होती अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. याच संदर्भात हा गुन्हा दाखल झाला असून यात अधिक काय नवीन धागे-दोरे गवसतात, ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Maharashtra SSC 10th Result 2020: MSBSHE expected to declare Class 10 results

मोठी बातमी! उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; अशा पध्दतीने पाहू शकता निकाल

Maharashtra SSC Result 2020 Date; आज लागणार दहावीचा निकाल…या वेबसाईटवर पाहा रिझल्ट