in

सुशांत प्रकरणात रुमी जाफरींची चौकशी होणार

Share

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी बिहार पोलीस लवकरच दिग्दर्शक रुमी जाफरी आणि अन्य काही जणांची चौकशी करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीआधारे बिहार पोलिसांचा तपास सुरू आहे.

सुशांतच्या बँक खात्यांमधील व्यवहारांची माहिती मिळवून ईडीला चौकशीची विनंती करणाऱ्या बिहार पोलिसांनी मुंबईतील तपासकाम सुरू ठेवले आहे. ईडी सुशांत प्रकरणार रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी आर्थिक अफरातफर केली आहे का, याचा तपास करत आहे.

आत्महत्या करण्याच्या काही तास आधी सुशांतने दिग्दर्शक रुमी जाफरी यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे सुशांत प्रकरणी जाफरी यांची चौकशी करण्याची तयारी बिहार पोलिसांनी केली आहे. जाफरी यांच्या व्यतिरिक्त बिहार पोलीस दिग्दर्शक मुकेश छाबडा आणि अन्य काही जणांची चौकशी करणार आहेत. रिया चक्रवर्ती हिची पण बिहार पोलीस लवकरच चौकशी करणार असल्याचे समजते.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कोरोनाने घेतला महापौर किशोरी पेडणेकरांचा मोठ्या भावाचा बळी…

सातारा शहराजवळ दिसला बिबट्या