in

सुशांतच्या केसचा तपास सीबीआय करणार की नाही, ११ तारखेला ठरणार

Anil Deshmukh Sushant Singh Rajput
Share

बिहार पोलिसांनी सुशांत केसचा तपास सीबीआयने करावा अशी शिफारस केली आहे. पण या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याची पुढील सुनावणी ११ ऑगस्टला होणार आहे. या सुनावणीच्यावेळी कोर्टाकडून योग्य ते निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ अंतर्गत अॅक्सीडेंटल डेथ रिपोर्टची नोंद केलीय. तर सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये सीआरपीसी कलम १५४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मुंबई पोलिसांना त्यांच्या तपासात अद्याप सुशांतचा मृत्यू संशयास्पद वाटलेला नाही.

बिहार पोलिसांनी सुशांतच्या आर्थिक व्यवहारांची प्राथमिक माहिती हाती आल्यानंतर थेट रियाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रियाने बिहार पोलिसांची भेट टाळली. यानंतर मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात मतभेद सुरू झाले. अखेर बिहार पोलिसांनी रियाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ईडीकडे तसेच सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयकडे केस हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली.

ईडीने सुशांतच्या पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. सुशांतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याची सलग दोन दिवस ईडीने चौकशी केली. यानंतर शुक्रवारी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक तसेच सुशांत आणि रियाची मॅनेजर श्रुती मोदी हिची ईडीने चौकशी केली. आज सलग दुसऱ्या दिवशी शौविकची चौकशी सुरू आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

औरंगाबादेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना

fire

गुजरातच्या वापीत केमिकल फॅक्टरीला आग