in

सातारा जिल्ह्यातील सुपुत्राला लडाख मध्ये वीरमरण

सातारा जिल्ह्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे याना लडाखमध्ये वीरमरण आले आहे. लडाख येथे देशसेवा बजावत असताना हवामानातील बदलामुळे सोमनाथ यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला.त्यातच ते बेशुद्ध झाले .त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देश सेवा करीत असताना अतिशय प्रतिकूल वातावरणाचा सामना करत असताना त्यांना हे वीर मरण आले . वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना याबाबत माहिती मिळाली.

वाई तालुक्यातील आसले येथील सोमनाथ मांढरे यांचे बंधू असलेले महेश मांढरे यांना याची माहिती कळविण्यात आली. सोमनाथ मांढरे यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा आणि दहा महिन्याची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव आज पहाटे दिल्ली येथे पोहोचेल. आज सायंकाळ पर्यंत आसले या मूळ गावी पोहोचेल . त्यांच्यावर शासकीय इतमामात असले येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यावर कोरोनाचं सावट

मिरा भाईंदर