in

सुप्रिया सुळेंना गाझीपूर बॉर्डरवर रोखलं

लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी पोहोचले आहेत. मात्र, या सर्वांना दिल्ली पोलिसांनी या सीमेवरच अडवलं आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

“अन्नदाता सुखी भवं असे आपल्यावर संस्कार झालेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांशी सरकार ज्या पद्धतीनं वागतंय हे अतिशय दुर्देवी आहे. आम्ही संसदेत मागणी करतोय की यावर वेगळी चर्चा व्हावी. पण सरकार यासाठी तयार नाही,”असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, केरळ सारख्या विविध राज्यातील खासदार एकत्र येवून शेतकरी आंदोलनाला भेट देणार होते. सर्व खासदार मिळून पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. “पोलिसांची ही कृती म्हणजे देशाच्या लोकशाहीवर होत असलेला मोठा हल्ला असून त्यावर कोणी बोलत नाही”, असं पंजाबमधील एका खासदारानं प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का ? आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

कर्करोगाविषयी जागृकता आणण्यासाठी ‘लोकशाही’ची मोहीम