मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयच्या प्राथमिक चौकशीसाठी निर्देश दिले होते. या आदेशाला आव्हान देत अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्ट आज सुनावणी होणार आहे. तसंच, मुंबई हायकोर्टाचा सीबीआय चौकशीचा आदेश रद्द करावा, अशी विनंती त्यांनी याचिकेत केली असल्याचे माहिती मिळत आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयचे दिल्लीतील पथक मुंबईत पोहोचले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह एक पोलीस अधिकारी व देशमुख यांच्या स्वीय सचिवांचीही हे पथक चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, सीबीआयच्या पथकात एकूण चार अधिकारी आहेत.
Comments
Loading…