in

‘सूर्या सिंघम’ सुपरस्टार सूर्या शिवकुमार कोरोना पॉझिटिव्ह

लोकशाही न्युज नेटवर्क | देशभरात कोरोना लसीकरणाला वेग आला असताना देखील कोरोनाची लागण होण्याचे प्रकार समोर येत आहेत. साउथ फिल्म इंडस्ट्रीतला दिग्गज अभिनेता सूर्या शिवकुमारला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने ट्वीट करून या संदर्भातली माहिती दिली आहे.

सूर्याने आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यावर सध्या उपचार सुरु आहेत. कोरोना वायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती अजून नियंत्रणात आली नाही आहे. अशा परिस्थितीत घाबरून चालणार नाही. मात्र कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्याने यावेळी म्हटले आहे.

सूर्याला कोरोना वायरसची लागण झाल्याची माहिती मिळताच साउथ फिल्म इंडस्ट्रीच्या सर्वच कलाकारांनी व सूर्याच्या फॅन्सने त्याच्यासाठी लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रातील कोरोनावाढीचा वेग कमी; आरोग्य विभागाची माहिती

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरण आज संसदेत गाजणार