in

दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन

ख्यातनाम दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन झालं आहे. त्या ७८ वयाच्या होत्या. त्या दीर्घकाळापासून कॅन्सर या आजाराशी लढा देत होत्या. आज सकाळी पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या १० दिवसांपासून त्या आयसीयूमध्ये होत्या. त्यांनी आता पर्यंत कासव, नितळ, अस्तु देवराई यासारखे अनेक आशयघन चित्रपटांचे दिग्दर्शित केले आहे . त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कासव या चित्रपटाला २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

देशविदेशात पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. सुमित्रा यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि लघुपटांचं लिखाणही केलं आहे. झोपडपट्टीतल्या महिलांचं आयुष्य दाखवणारा, १९८५ सालचा बाई हा सुमित्रा यांचा पहिला लघुपट हा त्यांच्या स्त्रीवाणी या शोधप्रकल्पाचा भाग होता.

दोघी’, ‘जिंदगी जिंदाबाद’, ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘संहिता’, ‘अस्तू’, ‘कासव’ हे त्यांची काही प्रमुख चित्रपट. या चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona| देशात पुन्हा लॉकडाऊन होणार? अमित शहांनी दिले संकेत

‘या’ ६ राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी ‘RT-PCR’ चाचणी बंधनकारक